❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, २५ जून, २०१९

चिकन बनी चाओ (Chicken Bunny Chow)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
४०० ग्रॅम चिकनचे तुकडे
धने पावडर एक चमचा
जीरे पावडर अर्धा चमचा
घरचा मसाला आवडीप्रमाणे
लाल तिखट आवडीप्रमाणे
हळद अर्धा चमचा
जीरे पाव चमचा
बडीशेप पाव चमचा (हवीच)
दालचीनीचा तुकडा: दिड इंच
चार लवंगा
चार पाच भरडलेले मिरे
दोन तमालपत्रे
दोन बटाटे (ऐच्छीक)
दोन लहान कांदे
दोन चांगले पिकलेले टोमॅटो
आलं लसुन पेस्ट दोन चमचे
कोथिंबिर, कढीपत्ता
दोन हिरव्या मिरच्या बी काढून, तळून
मिठ
तेल एक चमचा, तुप एक चमचा. (शक्यतो तुप वगळू नये)
स्लाईस न केलेला ब्रेड
क्रमवार पाककृती: 
प्रथम एका वाटीत धने-जीरे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, हळद हे एकत्र करुन त्याची पाण्यात पेस्ट करुन बाजूला ठेवावी.
पॅनमध्ये तुप व तेल टाकून जीऱ्याची व बडीशेपची फोडणी करावी. त्यात लवंग, दालचीनी व तमालपत्र टाकावे. जीरे चांगले फुलून आले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुन पेस्ट टाकून चांगले परतावे. बियांचा भाग काढून बारीक चिरलेले टोमॅटो परतावे व पाच मिनिट झाकण ठेवावे. टोमॅटो शिजुन कांद्याबरोबर मिळून आले की त्यात तळलेल्या मिरच्या टाकून चमच्याने चुरडून घ्याव्यात. तेल सुटू लागले की त्यात सर्व मसाल्यांची केलेली पेस्ट टाकावी. तेल सुटेपर्यंत परतावे. मसाला परतुन झाल्यावर त्यात चिकनचे व बटाट्याचे तुकडे टाकावेत व रंग बदलेपर्यंत परतुन घ्यावे. चिकन परतुन झाल्यावर त्यात प्रमाणात गरम पाणी घालावे. काही कढीपत्याची पाने हाताने चुरडुन घालावीत. मिरपुड आणि मिठ घालावे व एक चमचा तुप घालून मंद गॅसवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजून रस्सा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करावा व वरुन गरम मसाला पावडर टाकून, व्यवस्थित हलवून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे. 
स्लाईस न केलेला अर्धा ब्रेड लोफ घेवून त्याच्या आतील मऊ भाग काढून जागा करावी. त्यात वरील चिकनचे पिस ठेवून वरुन घट्ट मसाला (रस्सा) टाकावा. आतील निघालेल्या मऊ तुकड्यावरही रस्सा टाकावा. गरम असतानाच खायला घ्यावे.
१.
1.jpg
२.
2.jpg
वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 
१. चिकनचा रस्सा पातळ न करता अगदी अंगाबरोबर करावा.
२. ब्रेडमधे रस्सा शोषला जातो तसतसे त्याची चव छान होत जाते.
३. फोटो काढायचा असल्याने रस्सा वरुन टाकला नाहीए.
४. मुळ पाककृतीत मी मला हवे तसे बदल केले आहेत. तुम्हाला हवा तसा बदल तुम्ही करु शकता. गार्निशिंगसाठी वरुन उकडलेले अंडे किसुन टाकले की छान दिसते.
५. ही पाकृ माझा नवरा उत्तम करतो. घरी एकटा असला की त्याची ही आवडती डिश आहे
______________________________
साऊथ अफ्रिकेत असलेल्या एका मित्राने ही रेसेपी शिकवली होती. त्यात मला हवे तसे थोडेसे फेरफार करुन मी आम्हाला आवडेल अशी बनी चाऊ ही पाककृती बनवली. मुळ पाककृतीमधे मटनच घ्यायला सांगितलेय पण मला ब्रेडसोबत चिकन जास्त आवडते. हा पदार्थ व्हेजही छान लागतो. मटार आणि बटाटा घेऊन, बाकी कृती सेम ठेवायची. ब्रेड जसजसा घट्ट रस्सा सोक करतो तसतसा बनी खायला मजा येते.
पुर्वी हॉटेलमधे काम करणारे लोक मालकाने दिलेले कोरडे ब्रेड खाऊन दिवस काढत. त्यातल्याच कुणीतरी जरा डोके चालवून ब्रेड आतुन पोखरला आणि त्यात लॅम्बचे पिस लपवून बाहेर न्यायला सुरवात केली आणि या पाककृतीचा जन्म झाला. अर्थात ही माहिती मित्राकडून कळालेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप,...