❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, १ मे, २०१८

॥मार्तंडोपदेश॥

समस्त होऊ घातलेल्या नवऱ्यांसाठी-

काव्य शक्तीची कराया जोखणी | कैक दिसांनी स्पर्शली लेखणी |
मित्र लज्जेची मात्र राखणी | हेतु इतुकाची असे ||

नृपाविन जैसा प्रदेशू | यौवनाविन आवेशू|
पात्रता नसता उपदेशू | तैसाची जान ||

हा विषयू अवघा अगम्य | बाष्फळ तरीही सुरम्य |
गर्दभापुढील गीतेशी साम्य | उपदेशाचे तुम्हाप्रती ||

आपण तो व्यासंगमुर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती |
मित्रवर्गाची किर्ती | सांभाळली पाहीजे ||

तुमचे साठी कष्ट केले | परंतू दखलेस ना घेतले |
ऋणानूबंधे विस्मरन जाले | काय कारणे ||

लग्न एकच अवघा शब्द | आपणा सारीखा होय निर्बुद्ध |
गर्दभ जातीची ही लक्षणे शुद्ध | थोडी शरम पाहीजे ||

श्वसुर स्थानी दाखवावा स्वाभीमान | नाहीतो त्याहूनी बरा श्वान |
स्वजनात कसला मानापमान | मनी बाळगावा ||

जैसा हरिणकळपा माजी केसरी | सर्पराजा सामोरी बासरी |
तैसा जामात श्वसुर घरी | शोभला पाहिजे ||

सागराने देखीता अगस्ती | परशूरामे देखता क्षत्रीयवस्ती |
जामाते पाहूनीया स्थिती | श्वसुराची व्हावी ||

सदैव ध्यानी ठेवावे | मुठ झाकोनीया रहावे |
सत्यस्थिती कळो द्यावे | दारा पित्याशी || (दारा: पत्नी)

वेळू असूनही पावा | काक असूनही रावा |
गर्दभ असूनही उच्चैश्रवा | जामात श्वसूरघरी || (उच्चैश्रवा = ईंद्राचा घोडा)

पाटातील तुंब होऊनी रहावे | पाणी चालोच द्यावे |
विचार करुनी घसरावे | श्वसूरावरी ||

आधी गाजवावे तडाखे | तरी मग श्वसूरस्थान धाके |
ऐसे होता धक्के | संसारास बसती ||

या मित्रमंडळाच्या ठायी | लज्जा रक्षी ऐसा नाही |
त्या पुरता राहीलो मी काही | तुम्हा कारणे ||

अंती एकच सांगणे तुम्हा प्रती | मित्र, माता आणिक मती |
यावीन नाही कधीही गती | मनूष्य देहा ||

कटू वचने तुम्हा दुखावले | यातून अंती काय साधले |
योग्यता नसता सर्व लिहिले | क्षमा केली पाहिजे ||

|| इती श्री मित्रदास रचितम्, श्वसूर संकट निरसनम्, अक्कल वृध्दी स्त्रोत्रम्, संपुर्णम् ||

समस्त सासरे मंडळींसाठी-

पोटी आल्या कन्येचा l योगे पिता ही ग्रहदशा भोगे l
जामाताशी उपसर्गही पोचे l तो तर दशमग्रह ll

घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l
अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll

समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l
आला तरी कळो द्यावा l जामाताशी ll

गर्दभापुढे टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l
काम करून घ्यावे l गोजरे संयमाने ll

वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो द्यावी चाल l
मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll

दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजीदे धरणी ठायताणावी l
नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll

जे पेटल्यावीन जाळीतसे l जे जळावीण क्षाळीतसे l
जे रज्जुविनाही माळीतसे l तैसे होओनी राहावे ll

जो जामात होवुनी श्वसुरासी छळी l श्वसुर होताच दशमग्रह निर्दाळी l
मग पावे कीर्ती जळीस्थळी ll तो एक चतुर पुरुष जाण ll

जामाताशी दया ये कामा l क्रोध नये सोयर्याच्या धामा l
जेथ ज्याचा महिमा l ते तेथेच योजावे ll

खळा जमातांचे ठाई l शांती धरता पडणे अपाई l
जैसे कंटक मर्दावे पायी l तेवी जामात दंडावे ll

साधता वरीलिया युक्ती l कन्या संसारी सुखी होती l
जामाताची कुंठते मती l श्वासुरापुढती ll

देखुनी कन्येच्या दु:खा l स्नुषेचा होवुनी राहावे सखा l
तेथ दाविता क्रूरता l अध:पाता जाईजे ll

मग हरेल जामाताचे दु: l अवघे गोत पावती सुख l
अनित्य संसारी कौतुक l ऐसे करुनी जावे ll

या उपरीही आकळता द्वाड l जमातासमोर लागे पाड l
मनाचे ठोठवावे कवाड l तेथ मार्तंड असेची गा ll


४ टिप्पण्या:

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...