❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, २९ मे, २०१९

बाजार-हाट

काल अचानक बयोचा फोन आला “काका, मी बस स्टॉपवर आहे, न्यायला ये” आणि मला आनंदाचा धक्का बसला. तिचे हे नेहमीचेच आहे. कधी अगोदर फोन करुन येणार नाही.

बुधवार, २२ मे, २०१९

कॅलिग्राफी पेन (DIY)

माझ्या मित्राच्या कथांचा संग्रह प्रकाशित करायचे ठरले. मग काय, घरचे कार्य असल्यासारखा मला उत्साह आला. कथांची निवड, थोडेफार एडिटींग, कथासंग्रहाचे नाव या पासुन ते मुहूर्त कधीचा आणि प्रमुख पाहुणे कोण येथपर्यंत सगळ्या गोष्टींची धांदल उडाली.

गुरुवार, ९ मे, २०१९

उधारी खाते

पुण्यातून निघालो तर अगदी सावकाश ड्राईव्ह केले तरी जास्तीत जास्त दिड तासात मी गावी पोहचतो. त्यामुळे दर शुक्रवारी रात्री पुण्यातून निघायचे आणि दोन दिवस गावी थांबून सोमवारी सकाळी सरळ कामालाच हजर व्हायचे हे माझे ठरलेले गणित होते. पण हळू हळू पुण्यात रमायला लागलो आणि नकळत दर शनिवार-रविवार गावाला होणारी चक्कर आता चक्क दोन-तिन महिन्यातुन एकदा व्हायला लागली. कधी कधी त्यापेक्षाही जास्त काळ मध्ये जाऊ लागला. आई-बाबा, भाऊ एवढंच काही माझे विश्व नाहीए. माझ्या छोट्या विश्वाचा एक लहानसा भाग अजुनही गावीच राहीला आहे. झाडावरुन आंबा उतरवताना आवाक्याबाहेरची चार फळे झाडावरच रहावी आणि समोर कैऱ्यांचा ढिग असतानाही जीव मात्र त्या चार फळांध्येच गुंतावा तसा माझा जीव गावाकडे राहीलेल्या काही मित्रांमध्ये गुंतून राहीला होता.

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...